close

Large Call to Action Headline

“नाट्यप्रोमोशन्स” ही संकल्पना Evidyavruksh आणि Infinite Inclinations LLP, पुणे यांची आहे. याद्वारे नाट्य या क्षेत्राशी निगडीत गोष्टींचे प्रमोशन केले जाणार आहे. ज्या ज्या कलेत नाट्य आहे तिला प्रोत्साहन देणे हा हेतु आहे. नाट्य हे केवळ नाट्यकलेमध्ये नसून ते नृत्याचाही अंग आहे, संगीताचाही अंग आहे, विविध लोककलांचाही अंग नाट्य हे आहे. कारण कोणत्याही कलेत नाट्यमयता नाही असे होत नाही. इथे हौशी किंवा व्यावसायिक असा भेद नाही पण हौशी कलाकारांना प्रोत्साहन देणे हा मूळ हेतु आहे. त्याच बरोबर या कलाकारांना लागणाऱ्या छोटेखानी नाट्यमंदिरांची माहिती उपलब्ध करून देणे, प्रॅक्टिससाठी लागणाऱ्या जागांची माहिती उपलब्ध करून देणे, त्यांना जाहिरातीसाठी एक जागा निर्माण करून देणे हा प्रामुख्याने या संकल्पनेचा उद्देश आहे. त्याचबरोबर रसिक प्रेक्षकांना विविध कार्यक्रमांची / सादरीकरणांची माहिती उपलब्ध करून देणे हा सुद्धा प्रामुख्याने उद्देश आहे. कलाकार, तंत्रज्ञ, कलासंस्था यांची नावे व त्यांच्याशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांच्या social media अकाऊंटच्या लिंक्सही येथे उपलब्ध असतील ज्यामुळे हे सर्वजण एकमेकांशी सहज संपर्क साधू शकतील त्यामुळे या सर्वांनी येथे जरूर नोंदणी करावी त्यासाठी अगदी माफक शुल्क आहे. पुण्यातील हौशी नाटकांचे जसे की एकांकिका, दोन अंकी किंवा दीर्घांक या स्वरूपात जे प्रयोग होतात त्यांची जाहिरात या “नाट्यप्रोमोशन्स” द्वारे ऑनलाइन केली जाईल. तसेच इतर संस्था / कलाकार जे नृत्य, गायन, संगीत यांचे सादरीकरण करतात त्यांच्याही जाहिराती त्यांना “नाट्यप्रोमोशन्स” द्वारे प्रसिद्ध करता येतील. त्यामुळे पुण्यातील हौशी कलाकारांनी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा नक्की वापर करावा. येथे हौशी कलाकारांना परवडतील अशा दरात प्रमोशन केले जाणार आहे. लेखक / दिग्दर्शक / कलाकारांच्या मुलाखती हा सुद्धा “नाट्यप्रोमोशन्स” चा उद्देश आहे.